पुण्यात सहकार नगर मध्ये नाकाबंदी दरम्यान पोलिसांना एका टेम्पोमध्ये 138 कोटी रूपयांचं सोनं सापडलं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याजवळच गाडीत कोट्यावधी पैसे सापडले होते आणि आता सोनं सापडल्याने पोलिस अलर्ट झाले आहेत. राज्यात सध्या विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरूआहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी यंत्रणा अलर्ट मोड वर काम करत आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सोनं खाजगी कंपनीचं असून मुंबईहून पुण्याला ते आणलं जात होतं. सध्या कंपनीला संबंधित कागदपत्र पाठवण्याच्या सूचना दिल्या आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि इन्कम टॅक्सची या प्रकरणाची माहिती घेत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)