रविवारी मुंबईमध्ये सकाळी 05.15 वा. ते दुपारी 13.30 वा. टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा- 2024 (MUMBAI MARATHON 2024:) पर्यंत आयोजि करण्यात आली आहे. या स्पर्धेचा मुख्य मार्ग हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हुतात्माचौक चर्चगेट-मरिन ड्राईव्ह-पेडर रोड- हाजी अली-वांद्रे वरळी सागरी सेतु मार्ग-माहिम-प्रभादेवी-हाजी अली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा राहणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलीसांतर्फे या मार्गावर वाहतुकीवर निर्बंध लावण्यात येणार आहेत. यामुळे या मार्गावरुन धावणाऱ्या बसमार्गामध्ये बदल करण्यात आला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)