उत्तराखंड मध्ये चारधाम यात्रा 2024 मध्ये यंदा यात्रेकरूंची अभूतपूर्व गर्दी पाहता आता प्रशासनाने यात्रेसाठी पूर्व नोंदणी अनिवार्य केली आहे. https://registrationandtouristcare.uk.gov.in या संकेतस्थळावर नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यातआली असल्याची माहिती उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतूडी यांनी दिली आहे. भाविकांच्या सुकर दर्शनासाठी सध्या 31 मे पर्यंत व्हीआयपी दर्शन देखील बंद करण्यात आले आहे. तसेच वृद्ध आणि आजारी भाविकांना यात्रा सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय चाचणीचं आवाहन केले आहे.

चारधाम यात्रा पूर्व नोंदणी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)