राष्ट्रीय स्तरावरील तिरंदाज आणि सुवर्णपदक विजेती भावना चहल हिने चंदीगडमध्ये आत्महत्या केली आहे. पंजाब आणि हरियाणाच्या राजधानीत या महिला खेळाडूचा मृतदेह तिच्या घरात सापडला आहे. याबाबत पोलिसांनी कारवाई करत तिचा पती सचिन चहल याला भावनाचा हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी अटक केली आहे. वृत्तानुसार, 27 वर्षीय भावना हिचा शुक्रवारी रात्री नायगाव येथील दशमेश नगर येथील घरात मृत्यू झाला, त्यानंतर तिचे वडील प्रकाश चंद्र यांनी तिच्या पतीविरुद्ध हुंड्यासाठी छळाची तक्रार दाखल केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पती-पत्नी दोघेच चंदीगड येथे राहत होते. दोघांचीही कुटुंबे चंदीगडच्या बाहेर राहत होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)