Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ 26 डिसेंबर (गुरुवार) पासून दोन कसोटी मालिकेसाठी भिडणार आहे. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून खेळवला जाईल. तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांनंतर आता दोन्ही संघ दोन कसोटी सामन्यांमध्ये आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान पहिल्या कसोटी सामन्याचे सर्व तपशील खाली जाणून घ्या...(हे देखील वाचा: Sam Konstas New Record: जसप्रीत बुमराहविरुद्ध सॅम कॉन्स्टन्सने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील दुसरा खेळाडू)

शेवटचा सामना कधी खेळले दोन्ही संघ

झिम्बाब्वेने शेवटचा कसोटी सामना जुलै 2024 मध्ये आयर्लंडसोबत झाला. या सामन्यात दोन्हीकडून जोरदार ॲक्शन आणि रोमांचक खेळ पाहायला मिळाला. मात्र, आयर्लंडने हा सामना चार गडी राखून जिंकला. दुसरीकडे, अफगाणिस्तान सप्टेंबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार होते. मात्र, एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्यात आला. लांबलचक फॉर्मेटमध्ये कमी सरावामुळे, दोन्ही बाजूंना आगामी चकमकीत चांगल्या कामगिरीची आशा असेल.

झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान मधील पहिला कसोटी सामना किती वाजता सुरु होणार?

झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबर (गुरुवार) पासून बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे दुपारी 01:30 वाजता खेळवला जाईल, नाणेफेक 01 वाजता होईल.

झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे पहावे?

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यांचे दूरचित्रवाणी प्रसारण भारतात उपलब्ध होणार नाही. तथापि, या रोमांचक सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर पाहता येईल. क्रिकेट चाहत्यांना या प्लॅटफॉर्मवर भेट देऊन सर्व सामन्यांचे लाइव्ह ॲक्शन आणि अपडेट्स सहज पाहता येतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)