बिहार मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'मैं अटल रहुंगा' कार्यक्रमादरम्यान हंगामा झाल्याचं पहायला मिळालं आहे. भाजपाच्या या कार्यक्रमात भोजपुरी गायिका देवी यांनी महात्मा गांधी यांचं 'रघुपति राघव राजा राम' भजन गायलं मात्र त्यांनी पहिल्या काही ओळी गाताच त्यांना रोखण्यात आलं. गायिकेने स्टेजवरूनच माफी मागितली आणि नंतर 'जय श्री राम' च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयात वायरल होत आहे. कॉंग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत भाजपा वर हल्लाबोल केला आहे.
भोजपुरी गायिका देवी यांना मागावी लागली माफी
बापू का प्रिय भजन गाने पर भाजपा नेताओं ने लोकगायिका देवी जी को माफी मांगने पर मजबूर किया। "रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम" उनसे नहीं सुना गया।
दुनिया को दिखाने के लिए बापू को फूल चढ़ाते हैं लेकिन असल में उनके प्रति कोई आदर नहीं है। दिखावे के लिए बाबासाहेब अंबेडकर का… pic.twitter.com/jZJ1tL4t8y
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)