Manmohan Singh Passes Away: भारताचे माजी पंतप्रधान आणि माजी कॉंग्रेस खासदार डॉ.मनमोहन सिंह यांचे दिल्लीच्या एम्स रूग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यांचे वय 92 होते. संध्याकाळच्या सुमारास त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दिल्ली मध्ये एम्स रूग्णालयात आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले आहे. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी ट्विट करत या घटनेची माहिती दिली. दरम्यान त्यांनी काही वेळानंतर आपले ट्वीट डिलीट देखील केले.
पाहा रॉबर्ट वाड्रा यांचे ट्विट -
Robert Vadra tweets, "I am deeply saddened to learn of the passing of former Prime Minister Manmohan Singh ji. My deepest condolences to his family and loved ones. Thank you for your service to our Nation. You will always be remembered for your Economic revolution and the… pic.twitter.com/WwRZlYirvn
— ANI (@ANI) December 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)