Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team, 1st T20 Match 2024 Live Toss Update: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जात आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान सिकंदर रझाकडे आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व राशिद खान करत आहे. टी-20 मध्ये झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघ 15 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये अफगाणिस्तानचा वरचष्मा दिसत आहे. अफगाणिस्तानने 15 पैकी 14 टी-20 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेने फक्त 1 सामना जिंकला आहे. यावरून अफगाणिस्तानचा संघ अधिक मजबूत असल्याचे दिसून येते. पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, हजरतुल्ला झाझई, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, मोहम्मद इशाक, रशीद खान (क), मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फरीद अहमद मलिक
Afghanistan won the toss and opted to bat first in the T20I against Zimbabwe at Harare Sports Club. 🪙#ZIMvAFG #VisitZimbabwe pic.twitter.com/4D6Wc4iLyh
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)