Mumbai AQI | (Photo Credit- X)

Mumbai AQI Today:  मुंबईसह उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील हवेची गुणवत्ता सध्या चिंताजनक स्थितीत असून यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा अत्यंत चिंताजनक स्थितीत आहे. त्यामुळे सध्या मुंबईत ठिकठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.  (हेही वाचा  - Delhi Fog Updates: दिल्ली विमानतळावर दृश्यमानता घटली; धुक्यामुळे उड्डाणे आणि गाड्यांवर परिणाम)

पाहा पोस्ट -

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) आज अत्यंत चिंताजनक स्थितीत पहायला मिळत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या मुंबई शहरात बांद्रा कुर्ला कॉम्पेल्सच्या (BKC) च्या हवेची गुणवत्ता सध्या सर्वात खराब असून या ठिकाणचा हवेचा निर्देशांक हा 300 च्या पार गेला असून हा अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. अंधेरी आणि बोरिवली दरम्यान हा निर्देशांक 250 ते 300 च्या दरम्यान आहे. तर दक्षिण मुंबईच्या हवेचा निर्देशांक हा 150 ते 200 च्या दरम्यानचा आहे. ठाणे शहराचा AQI हा 125 ते 150 दरम्यान आहे. तर अंधेरी घाटकोपर दरम्यानचा AQI हा 200 ते 250 दरम्यानचा आहे. तर नवी मुंबईचा AQI हा 160 हा आहे.

https://www.aqi.in/ या वेबसाईटनुसार, सध्या मुंबईतील हवा 212 AQI इतकी नोंदवण्यात आली आहे. यामुळे जगातील 100 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबईची नोंद करण्यात आली आहे.