IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला (IND vs ENg 2nd Test) आजपासून सुरूवात झाली आहे. भारतीय संघ सध्या 0-1 ने पिछाडीवर आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला (Team India) पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारत मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे खेळली जात आहे. दरम्यान, नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालने 151 चेंडूत आपले शानदार शतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 174/2
💯@ybj_19 breaches the three figure mark and brings up his second Test century with a maximum 👏👏
Live - https://t.co/X85JZGt0EV #INDvENG@IDFCFIRSTBank pic.twitter.com/pZCqnhUu78
— BCCI (@BCCI) February 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)