Worcestershire County Ground Flooded: नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वूस्टरशायरमधील न्यू रोडचे मैदान (Worcestershire County Ground) जलमय झाले आहे. पुरामुळे संपूर्ण काऊंटीमधील घरांचे तसेच क्रिकेट मैदानांचे नुकसान झाले आहे, शहराचे अनेक भाग आता पाण्यात बुडाले आहेत, त्यामुळे सामान्य वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान कार्यालयाने गेल्या गुरुवारी दुपारी 12 वाजेपासून हवामानाचा इशारा जारी केला आणि शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दक्षिण इंग्लंडच्या उत्तर-पूर्व भागात पावसाचा अंदाज वर्तवला. त्यानंतर गेल्या 24 तासांत काही प्रमाणात पाऊस झाला असला तरी त्याचा प्रभाव कायम आहे. वूस्टरशायरमधील एका स्थानिक वृत्तपत्रानुसार, पाऊस पडतो तेव्हा हिवाळ्यात न्यू रोडला पूर येतो आणि हे वर्षही त्याला अपवाद नव्हते. वूस्टरशायर क्रिकेट क्लब हे 5500 आसनांचे मैदान 1896 मध्ये बांधले गेले. न्यू रोड मैदानावर तीन एकदिवसीय सामने आयोजित केले गेले आहेत परंतु शेवटचा सामना 1999 मध्ये झाला होता. (हे देखील वाचा: AFG Squad for the T20I Series against IND: भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, इब्राहिम झद्रानच्या हाती संघाची कमान)

पाहा फोटो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)