भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दिल्ली आणि मुंबईत होणाऱ्या विश्वचषक सामन्यांदरम्यान आणि नंतर फटाके न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली. जय शहा म्हणाले की, या दोन शहरांमध्ये हवेचे प्रदूषण वाढत आहे. मी हे प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) औपचारिकपणे मांडले आहे. वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही हा निर्णय घेतला आहे. मंडळ पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आहे.
याआधी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त केली. वायू प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाकडून उत्तरे मागवली आहे. (हेही वाचा - Shubman Gill and Sara Tendulkar जिओ वर्ल्ड प्लाझा इव्हेंटमध्ये एकत्र दिसल्याच्या चर्चा, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल)
पाहा पोस्ट -
“BCCI is sensitive to environmental concerns. I took up the matter formally with the ICC and there won’t be any fireworks display in Mumbai, which can add to the pollution level. The Board is committed to combating environmental issues and will always place the interest of our… pic.twitter.com/G0ONkjB5la
— ANI (@ANI) November 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)