विश्वचषक 2023 चा (ICC World Cup 2023) पहिला उपांत्य सामना आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. आजपर्यंत टीम इंडियाला उपांत्य फेरीसारख्या मोठ्या सामन्यात किवी संघाविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. पण यावेळी टीम इंडियाची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्कृष्ट राहिल्याने आज टीम इंडियाला हा विक्रम सुधारून अंतिम फेरी गाठण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करत न्युझीलंडसमोर 398 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडियासाठी स्टार फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक 117 धावांची खेळी खेळली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघाला 50 षटकात 398 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडून संघाला पाचवा धक्का बसला आहे. न्यूझीलंड संघाचा स्कोअर 295/5.
BOOM 💥
Glenn Phillips departs as Jadeja takes a skier 😎
Follow the match ▶️ https://t.co/yh8963Yhn3…#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNZ pic.twitter.com/Z6AzaFWT4N
— BCCI (@BCCI) November 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)