टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना (WTC Final 2023) खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि अनुभवी अष्टपैलू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) मराठीत प्लॅनिंग करताना दिसत आहेत. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हे दोन फलंदाज फलंदाजी करत असताना एकमेकांशी मराठीत बोलून प्लॅन बनवत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांना हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे.
जेव्हा दोन #मराठी माणसं एकमेकांना भेटतात! 😊 pic.twitter.com/pSrMW4jthv
— Suraj Borawake (@s_borawake) June 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)