बेंगळुरू येथे गुरुवारी न्यूझीलंडने श्रीलंकेला हरवल्यानंतर 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातून पाकिस्तान जवळपास बाहेर पडल्यानंतर, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले आहे. शनिवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर पाकिस्तानचा अंतिम गटात इंग्लंडशी सामना होत आहे. आता पुढे जाणे अशक्य असल्याने, सेहवागने एक पोस्ट शेअर केले ज्यामध्ये लिहिले आहे, “बाय, बाय, पाकिस्तान” (BYE BYE PAKISTAN). सेहवागनेही त्यांना मायदेशी सुरक्षित उड्डाणासाठी शुभेच्छा देण्याचे ट्विट होते, “पाकिस्तान जिंदाभाग! घरी परतण्यासाठी सुरक्षित उड्डाण करा. ” या ट्विटनंतर केलेल्या रिट्विटमध्ये सेहवागने श्रीलंका संघावरही टिका केली. त्यांने लिहले की "पाकिस्तान संघाला जो संघ सपोर्ट करतो तो देखील त्यांच्या सारखाच खेळतो. सॉरी श्रीलंका" (हेही वाचा - Rachin Ravindra Visits Grandparents House: न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटर रचिन रवींद्रची आजींने काढली दृष्ट; व्हिडिओ व्हायरल)
पाहा पोस्ट -
Pakistan Zindabhaag!
Have a safe flight back home . pic.twitter.com/7QKbLTE5NY
— Virender Sehwag (@virendersehwag) November 10, 2023
Pakistan ki khaas baat hai ki jis team ko Pakistan support karti hai, woh team Pakistan ki tarah khelne lagti hai 😂.
Sorry Sri Lanka. https://t.co/Qv960oju2m
— Virender Sehwag (@virendersehwag) November 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)