इंडियन प्रीमियर लीग 2024 ची (IPL 2024) सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आयपीएलचा 17वा सीझन उद्यापासून म्हणजेच 22 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तर आरसीबी संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. अशा परिस्थितीत क्रिकेटच्या गल्लीबोळात फक्त आयपीएलचीच चर्चा होत आहे. दरम्यान, आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्नाटकची स्थानिक भाषा कन्नडमध्ये काही शब्द बोलून विराट कोहलीने चाहत्यांची मने जिंकली. व्हायरल व्हिडिओमध्ये विराट कोहली म्हणाला की हा आरसीबीचा नवा अध्याय आहे. UNBOX कार्यक्रमादरम्यान विरार कोहली: मला सर्वांना सांगायचे आहे, इडू आरसीबी'या होसा अध्या", याचा अर्थ आरसीबीसाठी हा एक नवीन अध्याय आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)