इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 50 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स दहाव्या क्रमांकावर आहे. तत्पूर्वी, एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ भिडले. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आयपीएलमध्ये 7 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. दिल्लीत येताच कोहलीने संघाला दमदार सुरुवात केली. विराट कोहलीने 233व्या सामन्याच्या 225व्या डावात ही मोठी कामगिरी केली. कोहलीने आयपीएलमध्ये 5 शतके आणि 49 अर्धशतके झळकावली आहेत.
7⃣0⃣0⃣0⃣ 𝗜𝗣𝗟 𝗥𝗨𝗡𝗦 𝗙𝗢𝗥 𝗞𝗜𝗡𝗚 𝗞𝗢𝗛𝗟𝗜! 👑@imVkohli becomes the first batter to surpass this milestone in IPL 🫡
TAKE. A. BOW 👏#TATAIPL | #DCvRCB | @RCBTweets pic.twitter.com/VP4dMvLTwY
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)