भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याला कोणत्याही खास ओळखीची गरज नाही. आपल्या धडाकेबाज फलंदाजीने त्याने जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. क्रिकेटच्या मैदानावर त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत, ज्यामुळे सचिन तेंडुलकरनंतर कोहलीचे नाव क्रिकेट जगतात मोठ्या आदराने घेतले जाते. कोहली सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आता सोशल मिडिया इंस्टाग्रामवर विराट कोहलीने एक नवा विक्रम केला आहे. विराट हा भारतातील इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला खेळाडू आहे व आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 200 मिलियन फॉलोअर्स असणारा विराट कोहली हा एकमेव क्रिकेटर ठरला आहे. विराटने आज 200 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)