उन्मुक्त चंद (Unmukt Chand) यांची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. 2012 मध्ये भारताच्या अंडर-19 संघाला चॅम्पियन बनवल्यानंतर टीम इंडियामध्ये त्याचा समावेश जवळपास निश्चित झाला होता, परंतु त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. यानंतर त्याला टीम इंडियाच्या रणजी संघातून वगळण्यात आले आणि तो दिल्लीपासून दूर गेला. आयपीएलमध्ये त्याला विकत घेतले नसतानाही उन्मुक्तने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर त्याने अमेरिकेत क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि बिग बॅश लीग खेळणारा तो पहिला भारतीय क्रिकेटर बनला. दरम्यान आता पुन्हा त्याची बॅट तळपताना दिसुन आली त्याने T20 क्रिकेट मध्ये शतक ठोकले त्याने 67 बाॅलमध्ये 104 धावा केल्या.
पाहा व्हिडीओ
Another Striker doing big things⚡@UnmuktChand9 with a beautiful century going 104*(67) giving us the first century of #MiLC2022 😍 pic.twitter.com/wYEQBA9hnH
— Minor League Cricket (@MiLCricket) October 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)