ENG vs SA T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषकात सुपर-8 मध्ये (T20 World Cup 2024 Super 8) आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर (Darren Sammy National Cricket Stadium in St. Lucia) खेळवला जात आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना हा उच्च स्कोअरिंग असू शकतो. दोन्ही संघांकडे स्फोटक फलंदाजांची फौज आहे. जिथे इंग्लंडने सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेनेही अमेरिकेचा पराभव केला आहे. दोन्ही संघांमध्ये आज जो विजयी होईल तो उपांत्य फेरीत खेळणार हे जवळपास निश्चितच आहे. दरम्यान, इंग्लडंने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग-11

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जेन्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, ओटेनिल बार्टमन.

इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर), हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, रीस टोपली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)