आज आशिया कप 2023 च्या (Asia Cup 2023) सुपर फोर फेरीचा पहिला सामना खेळला जात आहे. पाकिस्तानसमोर बांगलादेशचे आव्हान आहे. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. सुपर फोरमध्ये पोहोचलेल्या चार संघांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश व्यतिरिक्त भारत आणि श्रीलंकेचे संघ आहेत. सुपर फोरमधील दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघ
पाकिस्तान: फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.
बांग्लादेश: मोहम्मद नईम, मेहदी हसन मिराज, लिटन दास, तौहीद हृदोय, शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), शमीम होसेन, अफिफ हुसेन, तस्किन अहमद, शोरफुल इस्लाम, हसन महमूद.
Asia Cup 2023
PAK vs BAN: Bangladesh win toss, opt to bat first vs Pakistan in Lahorehttps://t.co/VFbiLam8V3
— India Today Sports (@ITGDsports) September 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)