आज इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) चा 12 वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल. आयपीएलच्या 16व्या मोसमात मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा आरसीबीविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला होता. या सामन्यात रोहित शर्माची टीम मुंबई इंडियन्सचा या मोसमातील पहिला विजय नोंदवण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, सीएसकेचा संघ लखनौविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही विजयी मालिका सुरू ठेवू इच्छित आहे. दरम्यान, हा सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. जिओ सिनेमा अॅपवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग मोफत असेल.
All set for a mouth-watering clash 🔥🔥
Mumbai Indians 🆚 Chennai Super Kings ⏳
🏟️ Wankhede Stadium, Mumbai
Let us know which side are you on - 💙 or 💛#TATAIPL | #MIvCSK | @mipaltan | @ChennaiIPL pic.twitter.com/Qy5XzyRclZ
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)