T20 World Cup 2024 Schedule: जगभरातील क्रिकेट चाहते आगामी टी-20 वेळापत्रकाची (T20 World Cup 2024 Schedule) आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आज सर्वांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण विश्वचषकाचे वेळापत्रक आज सायंकाळी 7 वाजता जाहीर होणार आहे. यावेळी ही स्पर्धा वेस्ट इंडिज (West Indies) आणि अमेरिकेत (US) होणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध (IND vs IRE) होऊ शकतो. तर भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना 9 जून रोजी खेळवला जावू शकतो. टीम इंडियाला (Team India) अ गटात स्थान मिळू शकते. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 Series 2024: अफगाणिस्तान मालिकेत रोहित शर्मा खेळणार? केपटाऊन कसोटीनंतर काय म्हणाला 'हिटमॅन')

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)