विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) मध्ये भारत - पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून हा सामना दोन्ही संघ खेळणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामना हा बहुधा क्रिकेटमधील सर्वाधिक चर्चेचा सामना आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी प्रेक्षकांची खचाखच गर्दी होणार आहे. दरम्यान, पाकिस्तानी चाहते आणि प्रसारमाध्यमांना व्हिसा देण्यास झालेल्या विलंबाबद्दल पीसीबीने निराशा व्यक्त केला होती पणा आता त्यांची ही प्रतीक्ष संपली आहे. जवळपास 60 पाकिस्तानी पत्रकारांना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना कव्हर करण्यासाठी व्हिसा मिळाला आहे. कराचीतील अनेक पत्रकारांना व्हिसा एजन्सीकडून पुष्टी मिळाली आहे आणि ते सामन्याच्या दिवशी येण्याची अपेक्षा आहे. 60 पाकिस्तानी पत्रकार भारतातील या क्रिकेट दिग्गजांमधील महाकाव्याचे साक्षीदार होणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)