MI vs KKR, IPL 2024: आज आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सशी (MI vs KKR) यांच्यांत सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर संध्याकाळी 7.30 खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. केकेआर संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर मुंबई संघ नवव्या स्थानावर आहे. म्हणजेच दोन्ही संघांना हा सामना जिंकून पुढे जायचे आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता. (हे देखील वाचा: IPL 2024 Points Table: हैदराबादने राजस्थानकडून विजय हिसकावला, रोमांचक सामन्यात एका धावेने विजय; पॉइंट टेबलमध्ये घेतली चौथ्या स्थानी झेप)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)