SRH vs RR, IPL 2024 50th Match: दमदार सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्सचा (SRH Beat RR) एका धावेने पराभव केला. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 201 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्स संघ लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ 200 धावाच करू शकला. राजस्थान रॉयल्सला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज होती. त्यानंतर रोव्हमन पॉवेल क्रीजवर होता आणि भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीची जबाबदारी घेतली. त्याने शेवटच्या चेंडूवर पॉवेलला बाद केले. अशा प्रकारे हैदराबादचा संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. लक्ष्याचा पाठलाग करताना, आयपीएल 2024 मधील राजस्थान रॉयल्सचा हा पहिला पराभव आहे. या विजयानंतर हैदराबादने पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)