महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीग (MPL 2023) स्पर्धा 15 जूनपासून सुरु होत आहे. काही दिवसापूर्वी या लीगसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी या सहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 15 जूनपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेचा 29 जून रोजी समारोप होणार आहे. हे सर्व सामने पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअम, गहुंजे येथे (MCA Cricket Stadium, Pune) खेळले जातील. पुणेरी बप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. पुण्याचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे तर कोल्हापूर संघाची धुरा केदार जाधव याच्या खांद्यावर आहे. त्याआधी ओपनिंग सरेमनिचा कार्यक्रम रंगणार आहे. अमृता खानविलकर हिच्यासह अन्य कलाकार परफॉर्म करणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामातील सामने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये विनामूल्य पाहता येणार आहे.
खूशखबर 📣
महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामातील सामने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये विनामूल्य पाहता येणार!!
एमसीए स्टेडियम, गहुंजे येथे 15-29 जून दरम्यान होणार आयोजन
थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्स #MPL pic.twitter.com/9ZwZfMykAN
— #MPL 🏏 (@MaheshMGW23) June 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)