महिला आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये थायलंडच्या संघाने पाकिस्तान संघाला (ThailandW vs PakistanW) मोठा शाॅक दिला आहे. थायलंडने पाकिस्तानविरुद्धचा सामना चार गडी राखून जिंकला. थायलंडचा या स्पर्धेतील हा पहिला विजय आहे. याआधी बांगलादेशने नऊ विकेट्सनी तर श्रीलंकेचा 49 धावांनी पराभव केला होता. त्याचवेळी पाकिस्तानने मलेशिया आणि बांगलादेशचा नऊ विकेट्सच्या फरकाने पराभव केला होता, मात्र या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्पर्धेच्या समीकरणानुसार पाकिस्तानचा संघ अजूनही अंतिम फेरीच्या शर्यतीत आहे आणि थायलंडला पुढच्या फेरीत प्रवेश करणे कठीण आहे. येवढे असुनही थायलंडच्या महिला संघाने पाकिस्तानच्या संघाला हारवणे ही मोठी गोष्ट आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)