Terror Threat to T20 World Cup 2024: युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू होणा-या टी-20 विश्वचषक 2024 ला काही दिवस उरले आहेत. अशात या स्पर्धेबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. रिपोर्टमध्ये या स्पर्धेसाठी दहशतवादी धमकी मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. Cricbuzz च्या अहवालानुसार, T20 विश्वचषक सह-यजमान वेस्ट इंडिजला उत्तर पाकिस्तानकडून स्पर्धेसाठी दहशतवादी धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर क्रिकेट वेस्ट इंडिजने व्यापक सुरक्षा प्रोटोकॉलचे आश्वासन दिले आहे. स्पोर्ट्स वेबसाइट क्रिकबझच्या अहवालानुसार, प्रो. इस्लामिक स्टेटकडून या स्पर्धेच्या विरोधात मीडियामध्ये मोहीम चालवली जात आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या IS Khorasan (IS-K) या दहशतवादी संघटनेने व्हिडीओ जारी करून अनेक देशांना अशा धमकी दिली आहे, ज्यामध्ये वेस्ट इंडिजलाही टी20 वर्ल्ड कपच्या संदर्भात धमक्या आल्या आहेत. (हेही वाचा: Loud Noise From Sachin Tendulkar's House: सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील घराबाहेरून रात्री 9 वाजत मोठा आवाज येत असल्याची शेजाऱ्याची तक्रार; सोशल मिडियावर शेअर केली पोस्ट)
पहा पोस्ट-
Terror threat to T20 World Cup in West Indies from North Pakistan: Report
The T20 WC will be co-hosted by USA and West Indies from June 2 to 29.
DETAILS: https://t.co/AWLnfc9z8V#T20WorldCup #cricket pic.twitter.com/HD7L8w8brS
— TOI Sports (@toisports) May 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)