Loud Noise From Sachin Tendulkar's House: मुंबईमधील दिलीप डिसोझा या एक्स वापरकर्त्याने रविवारी रात्री एका पोस्टमध्ये क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरच्या वांद्रे येथील घराबाहेरून मोठ-मोठ्याने आवाज येत असल्याची तक्रार केली. सचिनच्या घरी बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सिमेंट मिक्सरमधून हा मोठा आवाज येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दिलीप यांची ही पोस्ट व्हायरल झाली असून त्यावर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. दिलीप यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मुंबई पोलीस किंवा बीएमसीला टॅग न करता, सचिनला टॅग केले आहे.

आपल्या पोस्टमध्ये दिलीप यांनी लिहिले की, ‘प्रिय सचिन तेंडुलकर, आता रात्रीचे जवळपास 9 वाजले आहेत आणि दिवसभर तुमच्या वांद्र्याच्या घराबाहेर मोठा आवाज करत असलेला सिमेंट मिक्सर अजूनही चालू आहे. कृपया तुमच्या काम करणाऱ्या लोकांना योग्य वेळी काम करण्यास सांगाल का?’. सचिन तेंडुलकरने या वर्षाच्या सुरुवातीला विस्तीर्ण दोराब व्हिला विकत घेतला होता. आता या ठिकाणी बहुमजली घर बांधण्यासाठी सध्याची रचना तोडली जात आहे. हे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले. सचिनने आधीच शेजाऱ्यांना इथे होणाऱ्या कामाची माहिती दिली होती. उपनगरातील वांद्रे येथील एका भूखंडावर तो नवीन घर बांधत आहे व तिथे होणाऱ्या बांधकाम कामांमुळे झालेल्या ‘गैरसोय’बद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्रही त्याने शेजाऱ्यांना पाठवले आहे. पेरी क्रॉस रोड परिसरातील सुमारे 100 रहिवाशांना तेंडुलकरचे पत्र मिळाले. मात्र आता रात्री उशिरापर्यंत चालू असलेल्या या कामांमुळे लोकांची चिडचिड होत असल्याचे दिसून येत आहे. (हेही वाचा: Marathi People Are Not Welcome Here: 'मराठी लोकांचे इथे स्वागत नाही'; मुंबईत नोकरीसाठी लिंक्डइनवर केलेल्या पोस्टवरून गोंधळ, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)