भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 फेब्रुवारीपासून चार सामन्यांची कसोटी मालिका (IND vs AUS Test Series) सुरू होणार आहे. त्यासाठी पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने बंगळुरूमध्ये सराव सुरू केला आहे, तर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ नागपुरात जोरदार सराव करत आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला सामना नागपुरातील वदर्भ क्रिकेट असोसिएशनमध्ये 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर गेल्या पाच वर्षांत प्रथमच जामठाच्या विदर्भ स्टेडियमवर कसोटी सामना खेळवला जात आहे. विराट कोहली, रवींद्र जडेजा, रोहित शर्मासह इतर खेळाडूही जोरदार सराव करत आहेत.

पहा फोटो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)