Australia Men's National Cricket Team vs India National Cricket Team, Border-Gavaskar Trophy 2024-25: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Boder-Gavaskar Trophy 2024-25) दुसरा सामना आजपासून म्हणजेच शुक्रवार, 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये (Adelaide Oval, Adelaide) खेळवला जाणार आहे. हा पिंक बाॅल कसोटी डे-नाइट सामना असेल. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता टीम इंडिया दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेतील आघाडी दुप्पट करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान, नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियामध्ये तीन बदल करण्यात आले आहेत. रोहित शर्मासह शुभमन गिल आणि आर अश्विनचे संघात पुनरागमन झाले आहे. तर देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बाहेर बसावे लागेल.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
4 changes:
Rohit 🔁 Jurel
Gill 🔁 Padikkal
Ashwin 🔁 Washi
Boland 🔁 Hazlewood
Pink-ball Test, letss gooo!
🔗https://t.co/wfMJTYdmOw | #AUSvIND pic.twitter.com/QfIu3kFpDt
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)