आयपीएलमधील एक यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे या सिझनमधील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. सोमवारी (9 मे) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमारच्या दुखापतीची बातमी समोर आली. मुंबईचा फलंदाज अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांना मुकला होता.

आयपीएलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव डाव्या हाताच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे टाटा आयपीएल 2022 मधून बाहेर पडला आहे. 6 मे 2022 रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध संघाच्या सामन्यात यादव जखमी झाला.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)