दिग्गज फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara) यांची 2023 च्या आयपीएल हंगामासाठी सनरायझर्स हैदराबाद (SRH) चे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टॉम मूडीच्या जागी, सनरायझर्स संघाने शनिवारी ट्विटरद्वारे जाहीर केले. 53 वर्षीय माजी खेळाडूची टी-20 संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून ही पहिली नियुक्ती असेल. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्य प्रशिक्षक टॉम मूडीज आणि सनरायजर्स हैदराबाद संघानं परस्पर संमतीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर गेल्या मोसमात संघाचा धोरणात्मक सल्लागार आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणाऱ्या लाराला मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलंय.
🚨Announcement 🚨
The cricketing legend Brian Lara will be our head coach for the upcoming #IPL seasons. 🧡#OrangeArmy pic.twitter.com/6dSV3y2XU2
— SunRisers Hyderabad (@SunRisers) September 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)