Sachin Railway Station:  भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 28 नोव्हेंबर रोजी गुजरात मधील सुरत येथील 'सचिन' रेल्वे स्थानकाचा आहे. फोटो शेअर करत एक कॅप्शन देखील लिहलं आहे. हा फोटो सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅप्शनमध्ये लिहले आहे की,  सुरतजवळच्या रेल्वे स्टेशनला आमच्या खेळातील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक आणि माझा आवडता व्यक्ती   असणाऱ्या व्यक्तीचे नाव दिले आहे. हे नाव देण्याची त्यांची किती आश्चर्यकारक दूरदृष्टी असेल, असा कॅप्सन लिहला आहे. या रेल्वे स्थानकाला नाव देणाऱ्या लोकांचे सुनिल गावस्करांनी कौतुक केले. हे गुजरातमधील सुरतमधील एक छोटेसे रेल्वे स्थानक आहे. स्टेशनमध्ये तीन प्लॅटफॉर्म आहेत आणि ते मुंबई-अहमदाबाद-जयपूर-दिल्ली मुख्य मार्गावर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)