Gujarat Train Derailment: गुजरातच्या सुरतमधील किम स्टेशनवरून (Kim Station) मंगळवारी दुपारी दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्स्प्रेसचा इंजिनाशेजारी असलेला प्रवासी नसलेला डबा रुळावरून घसरला (Tain Derailment). कोणत्याही प्रवासी किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत किंवा हानी झालेली नाही. रेल्वेच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 19015 दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्स्प्रेस ही ट्रेन 15:32 वाजता किम स्टेशनवरून सुटत असताना, इंजिनच्या शेजारी जोडलेल्या एका बिगर प्रवासी कोचची (VPU) 4 चाके रुळावरून घसरली. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस सुरतमध्ये रुळावरून घसरली
Derailment while departing Kim station Gujarat. 19015 Dadar Porbandar Express. No injuries to anyone. pic.twitter.com/BDBFpvJSJ0
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) December 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)