आशिया कपमधील (Asia Cup 2023) सुपर फोरमधील दुसरा सामना बांगलादेश आणि श्रीलंका (BAN vs SL) यांच्यात होत आहे. बांगलादेशचा संघ सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाला असून अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी या संघाला विजय मिळवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गतविजेत्या श्रीलंकेलाही विजयासह अंतिम फेरीतील आपला दावा मजबूत करायचा आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 257 धावा केल्या. श्रीलंकेकडून सदिरा समरविक्रमाने सर्वाधिक 93 धावा केल्या. कुसल मेंडिसनेही उत्कृष्ट अर्धशतक झळकावले. पथुम निसांकाने 40 आणि कर्णधार शनाकाने 24 धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून हसन महमूदने तीन बळी घेतले. शरीफुल इस्लाम आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)