सुपर फोरच्या अखेरच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर (SL vs PAK) 5 विकेट्सने मात केली. प्रथम फलंदाजी करणार्या पाकिस्तानला श्रीलंकेने अवघ्या 121 धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 18 चेंडू बाकी असताना 5 विकेटवर 124 धावा करत सामना जिंकला. 122 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली आणि पॉवरप्लेमध्येच टीमने तीन विकेट गमावल्या. मात्र, सिल्वा आणि निसांका यांच्यातील तिसऱ्या विकेटसाठी 27 धावा आणि त्यानंतर निसांकाने सिल्वासोबत चौथ्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे श्रीलंकेने सामन्यात पुनरागमन केले, आणि सामना जिंकला. निसांका 55 धावांवर नाबाद राहिला. तसेच रविवारी, 11 सप्टेंबर रोजी दोन्ही संघांमध्ये स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.
#AsiaCup2022 | Sri Lanka beat Pakistan by 5 wickets in match 6 of Super 4, in Dubai (Pathum Nissanka 55*, Bhanuka Rajapaksa 24)
The two teams will play the final match of the tournament on Sunday, 11th September.#PAKvsSL pic.twitter.com/FQbaD14UnM
— ANI (@ANI) September 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)