विश्वचषकातील 32व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला 190 धावांनी पराभूत (SA Beat NZ) केले. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला गेला. दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकातील हा सहावा विजय आहे. तत्तपुर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित 50 षटकांत चार गडी गमावून 357 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी रॅसी व्हॅन डर डुसेनने 133 धावांची शानदार खेळी केली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघाला 50 षटकात 358 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडचा संपूर्ण संघ धावावर 167 गारद झाला आणि 190 धावांनी दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर न्यूझीलंडकडून विल यंगने सर्वाधिक 33 धावा केल्या.
SOUTH AFRICA DEFEATED NEW ZEALAND BY 190 RUNS. pic.twitter.com/J20rBh8r37
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)