भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यातील शुभमन गिलच्या (Shubman Gill) खेळाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे, ज्याची माहिती खुद्द भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) दिली आहे. शनिवार, 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यापूर्वी शुभमन गिल 99 टक्के फिट झाला आहे. अशा परिस्थितीत तो हायव्होल्टेज सामन्यात खेळण्याची पूर्ण शक्यता आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सामनापूर्व पत्रकार परिषदेत याचा खुलासा केला आहे. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापूर्वीच शुभमन गिलला डेंग्यू झाला होता. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई आणि दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही गिलच्या खेळण्यावर शंका होती. भारतीय संघ गुरुवारी अहमदाबादला पोहोचण्याच्या काही तास आधी शुभमन गिल येथे पोहोचला होता. काल गिलने तासभर नेटवर सराव केला होता. त्याचवेळी शुभमन गिलही शुक्रवारी सराव सत्रासाठी भारतीय संघासोबत दिसुन आला.
Rohit Sharma confirms Shubman Gill is 99% available for the match against Pakistan tomorrow. pic.twitter.com/nC235pz31K
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)