भारताचा युवा स्टार शुभमन गिलने (Shubman Gill) विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विश्वविक्रम केला. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रविवारी (22 ऑक्टोबर) दोन्ही संघ आमनेसामने आले. या सामन्यादरम्यान गिलने एकदिवसीय क्रिकेटमधील दोन हजार धावा पूर्ण केल्या. त्याने सर्वात कमी डावात ही कामगिरी केली आहे. या प्रकरणात गिलने दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसह अनेक खेळाडूंना मागे सोडले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)