ENG vs PAK: कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. जिथे सामन्याच्या एक दिवस आधी बातमी आली होती की जवळपास 14 खेळाडूंची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे पहिली टेस्ट खेळता येणार नाही पण तसं काही घडलं नाही, तो सामना नियोजित वेळेत खेळवला गेला, त्यात इंग्लंडने चांगली फलंदाजी केली, पहिल्या दिवशी सामन्यात त्यांनी आपले वर्चस्व ठेवले. फक्त 4 विकेट गमावून 506 धावांची मोठी धावसंख्या उभारली, ज्यावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपली प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की, इंग्लंड संघ आजारी होता, मग त्यांनी एवढी मोठी धावसंख्या कशी काय उभारली, ते बरे असते तर त्यांनी काय केले असते? पाकिस्तानी गोलंदाजांपासून ते पाकिस्तानच्या प्रशिक्षकापर्यंत त्यांनी चांगलीच फटकेबाजी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)