आयसीसी क्रिकेट विश्वचषक (ICC Cricket World Cup 2023) आजपासून सुरू झाला आहे. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंडचे (ENG vs NZ) संघ एकमेकांशी झुंजत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, टीम इंडिया वर्ल्ड कप 2023 साठी पूर्णपणे तयार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे दोन्ही सराव सामने पावसामुळे वाहून गेले आणि आता संघाला 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. संघाबाहेर असलेला अनुभवी सलामीवीर शिखर धवनने भारतीय संघाला विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Chak De India! 🇮🇳 Let's paint the world blue, boys! All the best on your World Cup journey. Bring that trophy home! 🏏🏆 #TeamIndia #WorldCup2023 pic.twitter.com/pjC78lle4v
— Shikhar Dhawan (@SDhawan25) October 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)