एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सहा गडी राखून पराभव करत सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या पराभवानंतर मोहम्मद शमीने भावनिक पोस्ट केली आहे. दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता. संपूर्ण स्पर्धेत आमच्या संघाला आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आभार मानू इच्छितो. पंतप्रधानांचे आभार विशेषत: ड्रेसिंग रूममध्ये येऊन आमचा उत्साह वाढवल्याबद्दल. आम्ही परत बाउन्स करू! अशी आशा त्यांने व्यक्त केली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)