दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज क्रिकेट संघ भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषक (World Cup 2023) मध्ये स्थान मिळवण्यास मुकला आहे. विंडीजशिवाय विश्वचषक खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. आयसीसी क्रिकेट विश्वचषक पात्रता (ICC Cricket World Cup Qualifiers 2023) च्या सुपर सिक्स सामन्यात, स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचा (Scotland vs West Indies) 7 गडी राखून पराभव केला आणि त्यांना विश्वचषक 2023 मधून बाहेर काढले. विंडीजचा संघ 48 वर्षांनंतर पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळणार नाही. वेस्ट इंडिजने दिलेल्या 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंड संघाने 43.3 षटकांत 3 गडी गमावून 185 धावा केल्या. स्कॉटलंडसाठी यष्टिरक्षक-ओपनर मॅथ्यू क्रॉसने नाबाद 74 धावांची सर्वोच्च खेळी खेळली तर ब्रँडन मॅककुलन 69 धावांवर बाद झाला. जॉर्ज मुनसेने 18 धावांची खेळी खेळली, तर कर्णधार रिची बेरिंग्टनने नाबाद 13 धावांचे योगदान दिले. स्कॉटलंड संघाने प्रथमच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात विंडीजला पराभूत केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)