दिल्ली येथे सुरु असलेला कुस्तीपटूंचा संघर्ष अद्यापही कायम आहे. त्यांच्यावर दिल्ली पोलीस लाठीमार करत असल्याचेही व्हिडिओ आले आहेत. अशा वेळी देशभरातील अनेक खेळाडू या कुस्तीपटूंना पाठिंबा देत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला देशात आयपीएल फिवरही आहे. अशा वेळी कुस्तीपटू साक्षी मलिक हीने खोचक टोलेबाजी करत एमएस धोनी आणि सीएसके संघाचे कौतुक केले आहे. साक्षीने म्हटले आहे की, MS धोनी जी आणि CSK चे अभिनंदन. आम्हाला आनंद आहे की किमान काही खेळाडूंना ते पात्र आदर आणि प्रेम मिळत आहे. आमचा न्यायाचा लढा अजूनही सुरू आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)