रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या (Road Safety Series 2022) विजेतेपदाच्या लढतीत सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारताच्या लीजंडने (India Legends) शनिवारी रात्री सलग दुसऱ्यांदा श्रीलंका लींजडचा (Sri Lanka Legends) संघाचा पराभव केला. नमन ओझाच्या (Naman Ojha) झंझावाती शतकासमोर लंकेचा संघ चालला नाही आणि भारताने 22 धावांनी सामना जिंकला. याआधी 2021 मध्ये टूर्नामेंटच्या पहिल्या सीझनमध्ये इंडिया लिजंडने विजय मिळवला होता. नमन ओझाने 71 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 108 धावा केल्या होत्या. या जोरावर इंडिया लिजंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 195 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा लीजंड संघ 162 धावांवर ऑलआऊट झाला. विनय कुमारने तीन आणि अभिमन्यू मिथुनने दोन गडी बाद केले. नमन ओझाला सामनावीर तर तिलकरत्ने दिलशानला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
Road Safety World Series: Ojha's century guides Sachin-led India Legends to second straight title win
Read @ANI Story | https://t.co/CB3z3WvXsa#RoadSafetyWorldSeries2022 #cricket #SachinTendulkar #indiancricket pic.twitter.com/8RLxjA1pOF
— ANI Digital (@ani_digital) October 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)