टीम इंडिया आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आज आशिया कप 2023 चा (Asia Cup 2023) शेवटचा सुपर फोर सामना खेळला जात आहे. बांगलादेशचा संघ आधीच या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यासोबतच टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत त्याचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. दरम्यान, बांगलादेशविरुद्ध 1 झेल घेत कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 200 झेल पूर्ण केले आहेत. भारताचे 14 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या अक्षर पटेलच्या शेवटच्या चेंडूवर मेहदी हसन मिराजने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये रोहितच्या हातात पडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 झेल घेणारा रोहित शर्मा हा 5वा भारतीय क्षेत्ररक्षक ठरला आहे. रोहित शर्माने 497 डावात ही कामगिरी केली आहे. रोहित शर्मापूर्वी राहुल द्रविडने 334, विराट कोहलीने 303, मोहम्मद अझरुद्दीनने 261 आणि सचिन तेंडुलकरने 256 झेल घेतले होते.
Most catches by active fielders:
- Virat Kohli - 303
- Steve Smith - 288
- Joe Root - 280
- David Warner - 203
- Rohit Sharma - 200*. pic.twitter.com/7UPqbB4yFw
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)