IND-W vs BAN-W, Womens Asia Cup 2024: श्रीलंकेत सुरू असलेल्या महिला आशिया चषक 2024 मध्ये दररोज अनेक रोमांचक सामने खेळले जात आहेत. आज या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ यांच्यात डंबुला येथे खेळला जात आहे. आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत 4 वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 2 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशने दोनदा विजय मिळवला आहे. दरम्यान, बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 80 धावा केल्या. बांगलादेश संघाकडून निगार सुलतानाने सर्वाधिक 32 धावांची खेळी खेळली. टीम इंडियासाठी राधा यादव आणि रेणुका ठाकूर सिंग यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 81 धावा करायच्या आहेत.
WOMEN'S ASIA CUP 2024. WICKET! 19.3: Nahida Akter 0(2) b Radha Yadav, Bangladesh (Women) 80/8 https://t.co/JwoMEaSoyn #WomensAsiaCup2024 #SemiFinal #INDvBAN
— BCCI Women (@BCCIWomen) July 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)