Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru: आयपीएल 2025  (IPL 2025) आठवा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बगंळुरू (Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai) येथे खेळवला गेला. रॉयल चॅलेंजर्स बगंळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 50 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरुने चेन्नईसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई 20 षटकात 8 गडी गमावून 146 धावा करु शकली. आता रॉयल चॅलेंजर्स बगंळुरूच्या दुसऱ्या विजयासह, पॉइंट्स टेबलमध्ये मोठे बदल दिसू लागले आहेत. दरम्यान, आरसीबी सलग दोन सामने जिंकून पहिल्या स्थानावर पोहोचला आहे, तर चेन्नईची सातव्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच, लखनौ दुसऱ्या, पंजाब तिसऱ्या आणि दिल्ली चौथ्या स्थानावर कायम आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)